कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
उद्देशः राज्यातील वीरशैव – लिंगायत समाजातील परंपरागत व्यवसायाचे आधुनिकीकरण झालेले असल्याने त्या परंपरागत व्यवसायात कार्यरत असलेल्या तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या वीरशैव – लिंगायत समाजातील पात्र व्यक्तींना आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ व्हावा तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून कौशल्यपूर्ण बनवणे व त्याद्वारे रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.
१. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारा योजनेची प्रभावी मांडणी व अंमलबजावणी होण्याकरिता MSSDS यांचेमार्फत पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक साहाय्य करण्यात येते.
२. प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता MSSDS च्या पोर्टलला महामंडळाच्या पोर्टलची जोडणी करण्यात आली आहे.
३. महामंडळाकडून सदर पोर्टलचे लॉगिन क्रेडेन्शियल कस्टमाइज्ड करून घेण्यात आले आहे.
४. महामंडळाद्वारे निवडक प्रशिक्षण कार्यक्रमाची निवड करून त्याची अंमलबजावणी करण्यात येते.
५. समुपदेशन उपक्रम,असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शन कार्यक्रमास मदत व समर्थन करण्यासाठी MSSDS च्या जिल्हा यंत्रणेला महामंडळाची जिल्हा यंत्रणा सहाय्य करील.
६. किमान इयत्ता १० वी उत्तीर्ण व पुढील शिक्षण घेतलेल्या लिंगायत समाजातील युवकांना परंपरागत तसेच कौशल्य विकासाबाबत या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यावसायिक/शैक्षणिक संस्थांमार्फत प्रशिक्षण देऊन सहाय्य करण्यात येते.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. लिंक
लाभार्थी:
--
फायदे:
--
अर्ज कसा करावा
1. अर्जदाराने वर दिलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. या महामंडळाच्या संकेतस्थळावरील लिंकवर क्लिक करावे.
2. ओपन झालेल्या पेजवर “कौशल्य विकास प्रशिक्षण योजना” या टॅबवर क्लिक करा.
3. त्यानंतर लॉगिन पेज ओपन होईल.
4. आधार आयडी व पासवर्ड टाकून दिलेला कॅप्चा कोड योग्यरित्या भरा.
5. सर्व माहिती भरल्यानंतर “सबमिट” बटणावर क्लिक करा.
6. यानंतर पोर्टलमध्ये तुमचे लॉगिन होईल.