बंद

    महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना

    • तारीख : 09/08/2023 -
    1. वीरशैव – लिंगायत समाजातील महिलांचे सक्षमीकरण करुन त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
    2. सदर योजना ही ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.
    3. महिला बचत गटांना बँकांमार्फत वितरीत केलेल्या रु.05 लक्ष ते रु.10.00 लक्षपर्यंतच्या कर्ज रकमेवरील 12% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महामंडळाकडून संबंधित बचत गटांना अदा करण्यात येते.
    4. पात्र महिला बचत गटातील फक्त इतर मागास प्रवर्गाच्या महिला अर्जदारांना व्याज परतावा योजनेचा लाभ महामंडळाकडून देण्यात येईल.
    5. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) मार्फत शिफारस केलेल्या महिला बचत गटात किमान 50% वीरशैव – लिंगायत समाजातील महिला असतील असा बचत गट व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील.
    6. प्रथम टप्यातील कर्ज नियमित परतफेडीनंतर सदर बचत गट द्वितीय टप्प्यात रु.10 लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडून मंजूर करुन घेण्यास पात्र होईल.
    7. महिला बचत गटातील महिला इतर मागास प्रवर्गातील वीरशैव – लिंगायत समाजाची व महाराष्ट्राची रहिवाशी असावी.
    8. पात्र महिलांचे किमान वय 18 व कमाल वय 60 वर्षे राहील.
    9. महामंडळामार्फत महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये दर तिमाही व्याजाचा परतावा बँकेच्या मंजूरीनुसार 5 वर्षापर्यंतच्या कालावधीकरीता बँक प्रमाणिकरणानुसार अदा करण्यात येईल.
    10. सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) च्या सहाय्याने राबविण्यात येईल.
    11. लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) मार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावास महामंडळामार्फत पात्रता प्रमाणपत्र (LOI) निर्गमित करण्यात येते.

    महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. लिंक

    लाभार्थी:

    --

    फायदे:

    --

    अर्ज कसा करावा

    ऑनलाईन योजनेकरीता अर्ज करण्याची कार्यपध्दती :-

    1) अर्जदाराने वर दिलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. या महामंडळाच्या संकेतस्थळावरील लिंक वर क्लिक करावे.
    2) ओपन होणाऱ्या विंडोमध्ये होम मेन्यु वर क्लिक करून आवश्यक ती प्राथमिक माहिती भरावी.
    3) क्रिएट / एडिट प्रोफाईल ची विंडो ओपन होईल त्यामधील माहिती कन्फर्म करून साईन अप करावे.
    4) साईन अप केल्यानंतर अर्जदारास नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होईल.
    5) प्राप्त झालेल्या युजर आयडी व पासवर्ड च्या सहाय्याने भरलेली प्राथमिक माहिती सबमिट करावी.
    6) पोर्टलवर दिसणाऱ्या डँशबोर्ड मधील योजनांपैकी ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यावरील अप्‍लाय बटणवर क्लिक करावे.
    7) रजिस्ट्रेशन साठी ओपन होणाऱ्या विंडो मध्ये अर्जदाराने पर्सनल डिटेल्स / ॲड्रेस / फॅमिली डिटेल्स / बँक अकाऊंट डिटेल्स / लेंडिंग लोन डिटेल्स / अपलोड डॉक्युमेंटस् / डिक्लरेशन व समरी या टॅब अंतर्गत नमूद असलेली माहिती भरून अर्ज सबमिट करावा.